Posts

Showing posts from September, 2023

Rakhi

राखी... नारळी पौर्णिमा... माझ्यासाठी नेहमीच खूप जवळचा सण... सोहळाच म्हणा ना.... तसच भाऊबीज पण राखी जास्त महत्त्वाची.. जेव्हा १० भाऊ आणि एकटी बहीण असेल तर विचार करा किती भाव मिळत असेल मला 😄...    राखीच्या बरेच आठवणी आहेत आणि या सणाला त्या आल्याशिवाय रहात नाही... सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लग्नाआधी प्रत्येक राखी ला माझं माझ्या भवांसोबत भांडण होणं ठरलं होतं, Specially दादा सोबत... Tv madhe दाखवतात तसं प्रेमळ नाही ह.. आमचं तर WWE व्हायचं🤼... आणि मग त्यात "मी ह्याला राखी बांधणार नाही" हे माझं ठरलेलं वाक्य असायचं.    आईचं तिकडून एकच वाक्य यायचं "रोशू भांडतेस कशाला.. नको भांडू.... नंतर राखीला येता येणार नाही तेव्हा मात्र रडशील"... तेव्हा ते वाक्य आई मलाच का असं म्हणते म्हणून मी त्यावर argument करायची.. पण आता त्या वाक्यातील भावना अनुभवताना खूप दुःख होतं आणि खरंच राखी बांधायला मिळत नाही आहे महणून खूप रडायला येतं... आधी नोकरी साठी पुण्यात असेल तरी राखी आणि जन्माष्टमी असं दोन्ही सण साजरे होतील अश्या सुट्ट्या घ्यायची पण आता मात्र सासरी गौरी - गणपती जे की जन्माष्टमीच्या just ...